Worli Spa Murder Case : शरीरावर लिहिलेली ‘ती’ २२ नावे आणि हत्या झालेल्या गुरुचे काय होते कनेक्शन?

319
Worli Spa Murder Case : शरीरावर लिहिलेली 'ती' २२ नावे आणि हत्या झालेल्या गुरुचे काय होते कनेक्शन?
  • संतोष वाघ

वरळी स्पा हत्या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत गुरूसिद्धप्पा वाघमारे याने दुष्मनांची नावे टॅटूच्या रुपात दोन्ही पायांच्या मांड्यावर कोरून ठेवली होती. “या दुष्मनांची नावे डायरीत आहेत, चौकशी करून कारवाई करावी”, असे लिहून ठेवले होते. धक्कादायक बाब म्हणजे या कोरलेल्या २२ नावांमध्ये ‘सॉफ्ट टच स्पा’ मालक संतोष शेरेगर याचे नाव लिहिलेले होते. दरम्यान पोलिसांना वाघमारे याच्या घरी लाल रंगाची डायरी मिळून आली, ३ वेगवेगळ्या रंगांचे पेन वापरून कुठला दिवस कसा गेला हे वेगवेगळ्या रंगांच्या पेनाने लिहिले होते. (Worli Spa Murder Case)

(हेही वाचा – Chulbul Pandey Murder Case : स्पा मालकासह तिघांना अटक)

विलेपार्ले येथे राहणारा आरटीआय कार्यकर्ता तसेच पोलीस खबरी असलेला गुरूसिद्धप्पा वाघमारे याची वरळीच्या सॉफ्ट टच स्पा या ठिकाणी हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता पोलिसांना समजली, वरळी पोलिसांनी गुरूसिद्धपा वाघमारे याचा मृतदेह ताब्यात घेत नायर रुग्णालयात आणून मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा करण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे काढण्यात आल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. (Worli Spa Murder Case)

गुरूसिद्धप्पा वाघमारे याने आपल्या दोन्ही पायांच्या मांड्यांवर टॅटूने २२ जणांची नावे कोरली होती. त्याचसोबत एक संदेश देखील लिहिला होता, “ही माझ्या दुष्मनांची नावे आहेत, डायरीतही नावे आहेत, माझ्या जीवाला काही झाल्यास या लोकांची चौकशी करण्यात यावी”, असा संदेश कोरण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या नावांमध्ये अटक करण्यात आलेल्या सॉफ्ट टच स्पा चा मालक संतोष शेरेगर याचे नाव या २२ जणांच्या यादीत होते. (Worli Spa Murder Case)

(हेही वाचा – Murder : वरळीतील स्पा मध्ये पोलीस खबऱ्याची निर्घृण हत्या)

या कृत्यांमुळे गेला गुरुचा जीव 

दरम्यान पोलिसांनी गुरूसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याच्या घरी जाऊन तपासणी केली असता पोलिसांना लाल रंगाची डायरी मिळून आली. त्या डायरीत लाल, निळा आणि हिरवा रंगाच्या पेनांचा वापर करण्यात आला होता. लाल रंगाच्या पेनाने त्याने आजचा दिवस वाईट गेला, व त्याचे वर्णन केले, तसेच चांगल्या दिवसासाठी हिरवा रंगाच्या पेनाचा वापर केला होता, तर नॉर्मल दिवसासाठी त्याने निळ्या रंगाचा पेन वापरला होता. त्याचप्रमाणे वाघमारेने डायरीत विविध स्पा सेंटरमधून वसूल केलेल्या हप्त्यांचा लेखाजोखा मांडल्याचे आढळून आले आहे. गुरुसिद्धपा वाघमारे याने आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात शत्रू पाळले होते हे या टॅटू आणि डायरीवरून सिद्ध होत आहे. (Worli Spa Murder Case)

२०१४ पासून आजतागायत वरळीतील सॉफ्ट टच स्पा मधून वाघमारे हा हप्ता उकळत होता. त्याचबरोबर तक्रार करून स्पा वर कारवाई करण्यासाठी पोलिसांना खबर देत होता, वाघमारेमुळे मागील काही महिन्यांपासून सॉफ्ट टच स्पा बंद झाला होता. वाघमारेच्या या कृत्यामुळे संतापलेल्या संतोष शेरेगर याने गुरू वाघामारेच्या हत्येचा कट रचून फिरोज अन्सारीला हाताशी घेतले आणि त्याला हत्येसाठी ६ लाखांची सुपारी देऊन वाघमारेचा काटा काढायचे ठरवले. फिरोजचा देखील वाघमारेवर राग होता. कारण वाघमारेने फिरोजचा नालासोपाऱ्यातील त्याचा स्पा पोलिसांना खबर देऊन गेल्यावर्षी बंद पाडला होता. तसेच बोगस सिमकार्ड वापरून वाघमारे याने राजस्थान आणि गुजरात मधील अनेक स्पा बाबत पोलिसांना माहिती देऊन ते स्पा बंद पाडले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Worli Spa Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.