- ऋजुता लुकतुके
गतविजेता मुंबई इंडियन्सच्या संघाने डब्ल्यूपीएलच्या (WPL 2024) दुसऱ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सवर शेवटच्या चेंडूवर केली. विजयासाठी १७१ धावा हव्या असताना मुंबईने ४ गडी राखून हा सामना जिंकला. हरमनप्रीतने ३४ चेंडूंत ५५ धावा केल्या. तर यास्तिका भाटियाने ४५ चेंडूंत ५७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. आणि हे षटक सनसनाटी ठरलं. ॲलिस कॅप्सीने याच षटकातील पहिल्या आणि पाचव्या चेंडूंवर अनुक्रमे हरमनप्रीत आणि पूजा वस्त्रकार यांना बाद केलं. (WPL 2024)
अखेर संजनाने शेवटच्या चेंडूंवर दिल्लीची ऑफस्पिनर कॅप्सीला षटकार लगावत मुंबईला सामना जिंकून दिला. (WPL 2024)
𝙐𝙉𝘽𝙀𝙇𝙄𝙀𝙑𝘼𝘽𝙇𝙀!
5 off 1 needed and S Sajana seals the game with a MAXIMUM very first ball🤯💥
A final-over thriller in the very first game of #TATAWPL Season 1 🤩🔥
Scorecard 💻📱 https://t.co/GYk8lnVpA8#TATAWPL | #MIvDC pic.twitter.com/Lb6WUzeya0
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
(हेही वाचा – Paytm Crisis : रिझर्व्ह बँकेची पेटीएम प्रकरणात आणखी ताठर भुमिका)
या दोघींनी संघाला मोठी पायाभरणी करून दिली
त्यापूर्वी दिल्लीच्या संघाने १७१ धावा केल्या त्या १९ वर्षीय ॲलिस कॅप्सीच्या ७५ धावांच्या जोरावर. ५३ चेंडूंच्या या खेळीत तिने ६ चौकार आणि ३ मजबूत षटकार खेचले. तर दिल्ली संघाची कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मॅग लेनिंगने ३१ धावा केल्या. या दोघींनी संघाला मोठी पायाभरणी करून दिली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला १७१ धावा करणं शक्य झालं. (WPL 2024)
या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात मात्र चांगली झाली नव्हती. हेली मॅथ्यूज मुंबईच्या डावात दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. त्यानंतर मात्र हरमनप्रीत आणि यास्तिका यांनी मोठी भागिदारी रचली. आणि मुंबईला विजयाच्या जवळ आणलं. हरमनप्रीत आणि यास्तिकाने तिसऱ्या गड्यासाठी केलेली ५१ धावांची भागिदारी मुंबईच्या डावाला आकार देणारी ठरली. आणि यास्तिका बाद झाल्यानंतरही हरमनप्रीतने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवला. (WPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community