- ऋजुता लुकतुके
इंडियन प्रमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा संघ पहिल्या हंगामापासून एक तगडा संघ राहिला आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलिअर्स (AB de Villiers) हे अनुभवी खेळाडू गेली कैक वर्षं या संघाची सेवा करत आहेत. पण, पुरुषांच्या संघाला आतापर्यंत लीग कधी जिंकता आली नव्हती. पण, २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्ससाठी विजेतेपदाचा नारळ फुटला आहे तो डब्ल्यूपीएलमधील चषकाच्या निमित्ताने. स्मृती मंढाणाच्या नेतृत्वाखाली फ्रँचाईजीच्या महिला संघाने डब्ल्यूपीएलमध्ये यंदा बाजी मारली. त्यामुळे पुरुष संघाचंही मनोधैर्य उंचावलं आहे. (WPL 2024)
(हेही वाचा- Uttar Pradesh : उत्तरप्रदेशात दुहेरी हत्या करणारा धर्मांध आरोपी पोलीस चकमकीत ठार)
आयपीएलला दोन दिवस बाकी असताना पुरुषांचा संघ बंगळूरूच्या चिन्नास्वामी मैदानात सराव करत आहे. आणि या संघाने डब्ल्यूपीएल जिंकणाऱ्या महिला संघाचं ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन अभिनंदन केलं. अगदी विराट कोहली, कर्णधार फाफ दू प्लेसिस, कर्ण सिंग, मोहम्मद सिराज असे सगळे प्रमुख खेळाडू यात सहभागी झाले होते. (WPL 2024)
कर्णधार स्मृती मंढाणाच्या हातात डब्ल्यूपीएलचा चषकही होता.
We have the trophy
We have the streets
We have/had the greatest cricketersShow me better team than RCB i will da my account for forever. pic.twitter.com/7rog5byHPp
— Kevin (@imkevin149) March 19, 2024
गार्ड ऑफ ऑनरनंतर खेळाडूंनी होमग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी मैदानावर एक गोल फेरी मारली. कारण, हा सोहळा पाहायला काही चाहते आणि मीडियातील पत्रकारही आले होते. या सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या एलिस पेरीला कर्णधार स्मृतीने व्हीडिओ कॉल द्वारे कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. रविवारी डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. दिल्लीला ११३ धावांमध्ये रोखण्यात सोफी मॉलिनिक्स आणि श्रेयांका पाटील यांचा सहभाग होता. त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान फक्त दोन गडी गमावत पार केलं. (WPL 2024)
(हेही वाचा- Raj Thackeray : राज ठाकरेंनी मागितल्या दोन जागा; अमित शाह काय म्हणाले ?)
When you video call your friend cos she couldn’t make it. 😬
Perry Perry lady, we miss you, and all the best for your national duty! 🫡
📍 Johnnie Walker presents #RCBUnbox powered by @kotak_life and @Duroflex_world is live #PlayBold #ನಮ್ಮRCB #WPL2024 pic.twitter.com/Ir04yFLkNn
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 19, 2024
आता महिला सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे पुरुष खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे. आणि पुरुषांच्या आयपीएलमध्येही फाफ दु प्लेसिसच्या संघाचा प्रयत्न असेल तो लीग जिंकण्याचाच. मुलगा अकायच्या जन्मानंतर स्टार फलंदाज विराट कोहली बंगळुरू संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आणि विराटने आल्या आल्या महिला संघाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे. पुरुषांच्या संघाचा पहिला सामना येत्या २२ मार्चला चेन्नई सुपरकिंग्ज बरोबर असणार आहे. (WPL 2024)