ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने (BCCI) आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलच्या (WPL 2024) आयोजनातही कुठलीच कसर न सोडण्याचं ठरवलं आहे. उद्घाटनाच्या सोहळयात तरी तीच रंगत दिसून आली. बॉलिवूडचा बादशाह किंग खान सोहळ्याला उपस्थित होता. आणि देशभरातील तमाम महिलांची आवडती दिलवाले दुल्हनीया पोझ घेऊन त्याने कार्यक्रमची सुरुवात केली. फक्त शाहरुखच (ShahRukh) नाही तर कार्तिक आर्यन , सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, टायगर श्रॉफ आणि शाहीद कपूर यांनीही त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या तालावर ठेका धरला. (WPL 2024)
(हेही वाचा- Ind vs Eng 4th Test : रविचंद्रन अश्विनच्या नावावर ‘हा’ अनोखा विक्रम )
त्यामुळे डब्ल्यूपीएलची सुरुवात बहारदार झाली.
SOUND ON 😍
𝙎𝙝𝙖𝙝 𝙍𝙪𝙠𝙝 𝙆𝙝𝙖𝙣 👑 showcases his aura at the #TATAWPL Opening Ceremony 🤩🤩@iamsrk pic.twitter.com/WLjSmCxVXL
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
Bengaluru erupts with joy to welcome Shahid Kapoor to the #TATAWPL Opening Ceremony 😃🙌@shahidkapoor pic.twitter.com/C2LckHvV2D
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
That’s ONE roaring performance, courtesy @iTIGERSHROFF 😍#TATAWPL pic.twitter.com/JwRLGyQov2
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
सुरुवातीलाच यंदाच्या हंगामासाठीच्या थीम साँगचं अनावरण झालं. आणि त्यानंतर सुरू झाले शाहीद कपूर , आर्यन कार्तिक आणि टायगर श्रॉफ यांचे कार्यक्रम. (WPL 2024)
View this post on Instagram
खरी रंगत वाढली जेव्हा किंग खान मैदानात आला. आणि त्याने पाचही संघांच्या कर्णधारांना व्यासपीठावर बोलवलं. डब्ल्यूपीएल (WPL 2024) करंडकाजवळ कर्णधार आणि शाहरुख (Shah Rukh) उभे राहिले. आणि मीडियाला फोटोची संधी मिळाली. तसंच स्पर्धेचं रणशिंगही फुंकलं गेलं. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स , युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स अशा पाच संघांमध्ये पुढचा महिनाभर हे युद्ध रंगणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community