- ऋजुता लुकतुके
पुरुषांप्रमाणेच महिलांची आयपीएल स्पर्धाही विविध शहरांमध्ये खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. (WPL Auction 2024)
महिलांची आयपीएल म्हणजेच डब्ल्यूपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव येत्या ९ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. डब्ल्यूपीएलचा हा फक्त दुसरा हंगाम असणार आहे. पण, त्याची हवा क्रिकेट वर्तुळात तयार झाली आहे. यंदाच्या लिलावात १६५ खेळाडूंवर बोली लागेल. (WPL Auction 2024)
डब्ल्यूपीएलचा पुढील हंगाम २०२४मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात रंगेल असा अंदाज आहे. नोंदणी झालेल्या १६५ खेळाडूंपैकी १०४ भारतीय आहेत तर ६१ खेळाडू परदेशी आहेत. (WPL Auction 2024)
🥁 𝐌𝐚𝐫𝐤 𝐲𝐨𝐮𝐫 𝐂𝐚𝐥𝐞𝐧𝐝𝐚𝐫𝐬!
🔨 #TATAWPL Auction
🗓️ 9th December 2023
📍 Mumbai pic.twitter.com/rqzHpT8LRG
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 24, 2023
डब्ल्यूपीएलमध्ये सध्या पाच फ्रँचाईजींचे पाच संघ आहेत. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, युपी वॉरिअर्स आणि गुजरात जायंट्स. या संघांना मिळून ३० खेळाडू विकत घेता येणार आहेत आणि यातल्या ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. (WPL Auction 2024)
(हेही वाचा – Winter Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक)
डब्ल्यूपीएल २०२४ हंगामाच्या लिलावाचं वेळापत्रक,
काय? – डब्ल्यूपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव
कुठे? – मुंबई
कधी? – ९ डिसेंबर
वेळ? – २.३० दुपारी
लिलावाच्या थेट प्रसारणाचे हक्क स्पोर्ट्स १८ नेटवर्ककडे आहेत आणि जिओ सिनेमावर याचं प्रसारण करण्यात येणार आहे. (WPL Auction 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community