-
ऋजुता लुकतुके
महिलांच्या प्रिमिअर लीगमध्ये नवीन हंगामाची तयारी सुरू झाली आहे. पाच संघांनी मिळून ६० खेळाडूंना आपल्याकडे कायम राखलं आहे. उर्वरित खेळाडू आणि हंगामात नव्याने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंसाठी आता लिलाव होईल. महिला क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडू हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, मेग लॅनिंग यांच्यासह आणखी ६० खेळाडूंना महिला प्रिमिअर लीगमधील त्यांच्या संघांनी आपल्याकडे कायम राखलं आहे. यात २१ परदेशी खेळाडूही आहेत. १५ ऑक्टोबर ही कुठले खेळाडू संघ कायम राखणार हे प्रशासनाला कळवण्याची अंतिम तारीख होती. (WPL)
त्यानंतर ही खेळाडूंची यादी गुरुवारी जाहीर झाली आहे. यंदाच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने ही लीग जिंकली होती. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुंबई इंडियन्सनी हरमनप्रीतला आपल्याकडे कायम राखलंय. त्याचबरोबर हेली मॅथ्यूज, यस्तिका भाटिया, नॅटली ब्रंट, एमिलीया केर आणि इसाबेल वाँग यांनाही संघाने कायम राखलंय. (WPL)
दिल्ली कॅपिटल्सचा संघ या हंगामात उपविजेता होता. त्यांनी संघातील १५ खेळाडू कायम राखले आहेत. युपी वॉरियर्सचा संघ यंदा तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनी आपला मुख्य संघ कायम ठेवलाय. पण, विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकन तेज गोलंदाज शबनम इस्माईलला युपी वॉरियर्सनी मोकळं केलं आहे. तिच्या बरोबरच देविका वैद्य, सिमरन शेख आणि शिवाली शिंदे या खेळाडूंनाही संघाने सेवेतून मोकळं केलं आहे. (WPL)
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची वाट लावली – चंद्रशेखर बावनकुळे)
डब्ल्यूपीएल लीगमधील पाचही संघांनी कुठले खेळाडू कायम ठेवलेत त्याची यादी पाहूया…
मुंबई इंडियन्स – अमनज्योत कौर, एमेरिया केर, क्लोव्ह ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमेरा काझी, इसाबेल वाँग, जिंतिमाली कलिटा, नॅटली स्किव्हर-बर्न्ट, पूजा वस्त्रकार, प्रियंका बाला, साईका इशाक व यस्तिका भाटिया
दिल्ली कॅपिटल्स – ॲलिस कॅपसी, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉडरिग्ज, जेस जोनासन, लॉरा हॅरिस, मॅरिझान केप, मेग लॅनिंग, मिनू राणी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्थी, तानिया भाटिया व टितास साधू
गुजरात टायटन्स – ॲशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोलवात, शबनल शकील, स्नेह राणा व तनुजा कनवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – आशा शोभना, दिशा कासट, ईलीस पेरी, हिदर नाईट, इंद्राणी रॉय, कनिका रॉय, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मंधाना व सोफी डेविन
युपी वॉरियर्स – एलिसा हेली, अंजली सर्वानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पारशवी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्सेलस्टोन व तहलिया मॅकग्रॅथ (WPL)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community