कुस्तीच्या तालमीत सराव करताना पुण्यातील पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू

wrestler swapnil padale passed away in pune

कुस्तीविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान, महाराष्ट्र चॅम्पियन स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे याचे बुधवारी आकस्मित निधन झाले. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक तो खाली कोसळला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्निलच्या निधनाने कुस्तीविश्वावर शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा – मुंबईतून क्लीनअप मार्शल कायमचे हद्दपार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here