-
ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, अमन सेहरावत आणि राष्ट्रकूल कांस्य विजेती गीता फोगाट यांनी एकत्र येऊन कुस्तीत चॅम्पियन्स सुपर लीग सुरू करण्याची तयारी चालवली आहे. या लीगमधून चांगले कुस्तीपटू घडावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. पण, ही लीग सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाले असून भारतीय कुस्ती फेडरेशनने लीगला मान्यता द्यायला नकार दिला आहे. मूळातच हे खेळाडू आणि सध्याचं कुस्ती फेडरेशन यांच्यात सध्या विस्तव जात नाहीए. (Wrestling Champions Super League)
(हेही वाचा- Ind vs South Korea, Hockey : द कोरियाचा ४-१ ने पराभव करत भारतीय संघ आशियाई चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत )
ही लीग नेमकी कशी पार पडणार, तिची वेळ, तारीख आणि कार्यक्रम कसा असणार याविषयी अजून कुठलीही स्पष्टता नाही. पण, माजी कुस्तीपटू गीता फोगाट लीगविषयी सकारात्मक आहे. परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक भारतात आल्यामुळे स्पर्धेचा दर्जा वाढेल. आणि त्याचा फायदा भारतीय कुस्तीपटूंना होईल, असं तिचं म्हणणं आहे. केंद्रसरकार आणि कुस्ती फेडरेशनचा पाठिंबा मिळेल अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. (Wrestling Champions Super League)
India’s wrestling talent has so much quality & depth. All that it needs is a world-class platform where they can further strengthen their bodies, skills & minds. The Wrestling Champions Super League is exactly what we need because it will transform our wrestling. pic.twitter.com/kWSCrHopaN
— Aman Sehrawat (@IamAmanSehrawat) September 16, 2024
‘मी आणि साक्षी काही वर्षांपासून ही लीग सुरू करण्याची स्वप्न बघत आहोत. आम्ही अजून कुस्ती फेडरेशनशी याविषयी बोललेलो नाही. पण, ते आणि केंद्रसरकारने सहकार्य केलं तर मजाच येईल. कुठल्याही देशात खेळाडूंनी एकत्र येऊन खेळाडूंच्या भल्यासाठी चालवलेली ही पहिलीच लीग असेल,’ असं फोगाट पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली. ‘खेळाडूंच्या भल्यासाठीच या लीगचं आयोजन होणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी अगदी मोकळेपणाने यात सहभागी व्हावं,’ असं आवाहनही गीतानं केलं. (Wrestling Champions Super League)
(हेही वाचा- Lalbaugcha Raja 2024 : लालबागचा राजाच्या चरणी आली राजकीय चिठ्ठी; काय आहे प्रार्थना ?)
पण, त्याचवेळी कुस्ती फेडरेशनचे सध्याचे अधक्ष संजय सिंग यांनी लीगला मान्यता द्यायला नकार दिला आहे. उलटपक्षी, फेडरेशनकडून प्रो कुस्ती लीग सुरू करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजबूषण सरन यांच्या विरोधात आंदोलन करताना साक्षी, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया एकत्र होते. पण, उर्वरित दोघांनी काँग्रेस पक्षात म्हणजेच राजकारणात प्रवेश केल्यानंतर साक्षी मलिक त्यांच्यापासून वेगळी झाली आहे. आणि त्यानंतर तिने हा लीगचा उपक्रम सुरू केला आहे. (Wrestling Champions Super League)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community