Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघ निलंबित

आगामी विश्वविजेतपद स्पर्धेत भारतीय खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत

238
Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघ निलंबित

ऋजुता लुकतुके

द युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीतील जागतिक संघटनेनं भारतीय कुस्ती संघटनेवर (Wrestling Federation of India) निलंबनाची कारवाई केली आहे. वेळेवर निवडणुका न घेतल्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी भारतीय संघटना आता निलंबित असेल. खरंतर जून २०२३ पर्यंत भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक व्हायला हवी होती.

पण, सुरुवातीला कुस्तीपटूंचं ब्रिजभूषण शरण (Wrestling Federation of India) यांच्याविरोधातील आंदोलन आणि त्यानंतर चंदिगड कोर्टाने निवडणुकीवर घातलेली बंदी यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत, आणि त्याचं पर्यवसान कुस्ती संघटनेच्या निलंबनात झालं आहे. पण, याचा फटका भारतीय कुस्तीपटूंना आगामी कुस्ती विश्वविजेतेपदाच्या लढतीत बसू शकतो.

भारतीय खेळाडूंना (Wrestling Federation of India) आता भारताचं प्रतिनिधित्व करता येणार नाही. तसेच त्यांना आता ऑलिम्पिक ध्वजाखाली खेळावं लागेल. आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये मात्र भारतीय संघ खेळू शकेल. कारण, तिथे भारतीय खेळाडूंची निवड भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं केली आहे. या स्पर्धा २३ सप्टेंबरपासून चीनमध्ये हूआंगझाओ इथं होणार आहेत.

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक (Wrestling Federation of India) १२ ऑगस्टला होणार होती. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी आपल्या पाठीराख्यांचं पॅनलही निवडणुकीला उभं केलं होतं. २५ राज्य संघटनांपैकी २० संघटनांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा केला होता. पण, त्यामुळे ब्रिजभूषण शरण यांना विरोध असलेल्या माजी पदक विजेत्या खेळाडूंनी शरण यांच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यातच चंदिगड संघटना कोर्टात गेल्यामुळे ऑगस्टमध्ये निवडणूक होऊच शकली नाही.

(हेही वाचा – NCP : “अजित पवार आमचेच नेते”; सुप्रिया सुळे यांच्यानंतर शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण)

एकाच वर्षात तिसऱ्यांदा निलंबन

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर्षी तिसऱ्यांदा भारतीय कुस्ती संघटना (Wrestling Federation of India) निलंबित केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात भारतातील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत नवी दिल्लीत आंदोलन सुरू केलं. त्यावेळी आंतरराष्ट्रीय संघटनेनं पहिल्यांदा भारतीय कुस्ती संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती.

त्यानंतर भारतीय कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळलं (Wrestling Federation of India) आणि निवडणुकाही वेळेवर होण्याची चिन्हं नव्हती त्यामुळे मे महिन्यात पुन्हा एकदा संघटनेवर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संघटनेच्या कार्याकारिणी निवडणुकीची सगळी तयारी झाली होती. पण, यावेळी पंजाब आणि हरयाणाच्या संघटना कोर्टात गेल्या आणि कोर्टाच्या स्थगितीमुळे या निवडणुका पुन्हा एकदा होऊ शकल्या नाहीत.

तेव्हाच जागतिक संघटनेनं भारतीय कुस्ती संघटनेला निलंबनाचा (Wrestling Federation of India) इशारा दिला होता. आणि अखेर ती कारवाई त्यांनी केली आहे. निवडणुकाच न झाल्यामुळे भारतीय कुस्ती संघटनेचा कारभार सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेची एक तात्पुरती समिती पाहत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.