Wrestling Olympic News : ऑलिम्पिकसाठी संघ निवडीचे निकष कुस्ती फेडरेशन २१ मे ला जाहीर करणार

Wrestling Olympic News : पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्ती संघ निवडण्यासाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्याचा कुस्ती फेडरेशनचा विचार आहे.

211
Kushti Olympic Quota : ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी नाही, कोटा मिळवलेले खेळाडूच पॅरिसला जाणार
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympics) भारतीय कुस्ती संघ कसा निवडायचा याचे निकष ठरवण्यासाठी कुस्ती फेडरेशनने कार्यकारिणीची बैठक येत्या २१ मे ला बोलावली आहे. आणि तिथेच ऑलिम्पिक संघाविषयी निर्णय होणार आहे. आतापर्यंत झालेल्या विविध पात्रता स्पर्धांमधून भारताने ६ ऑलिम्पिक कोटा मिळवले आहेत. यात अमन सेहरावत या एकमेव पुरुष कुस्तीपटूचा समावेश आहे. बाकी पाचही कोटा हे महिलांनी मिळवले आहेत. (Wrestling Olympic News)

आता या सहा जागांवर कुणाला पाठवायचं हा निर्णय कुस्ती फेडरेशनचा (wrestling federation) असेल. यापूर्वी फेडरेशनने निवड चाचणी स्पर्धा घेण्याचं ठरवलं होतं. निवड चाचणी स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकांवर आलेले खेळाडू ऑलिम्पिक कोटा मिळवलेल्या कुस्तीपटूशी स्पर्धा करतात. आणि यातील विजेत्या खेळाडूला ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळते, असं यापूर्वी झालेलं आहे. २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारे चारही कुस्तीपटू कुठल्याही निवड चाचणीशिवाय ऑलिम्पिकमध्ये खेळले होते. (Wrestling Olympic News)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी२० विश्वचषकाचा ब्रँड अँबेसिडर युसेन बोल्टवर क्रिकेटवर काय म्हणाला?)

पण, यंदा निवडीची प्रक्रिया काय असेल ते अजून ठरायचं आहे. जर कुस्ती फेडरेशनने (wrestling federation) निवड चाचणी स्पर्धा न घेता कोटा विजेत्या खेळाडूंनाच संधी द्यायचं ठरवलं तर रवी दाहिया आणि सरिता मोर या आघाडीच्या कुस्तीपटूंची ऑलिम्पिक समावेशाची संधी हुकेल. कारण, आता कुठलीही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा बाकी नाही. किंवा सर्व वजनी गटात निवड चाचणी न घेता, ती काही ठरावीक गटांतच घेण्याचा निर्णयही कुस्ती फेडरेशन घेऊ शकते. हा फैसला मात्र २१ मे लाच होईल. २६ जुलैला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. (Wrestling Olympic News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.