मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील कुस्तीप्रेमींसाठी लाल मातीतील थरार अनुभवण्याची संधी येत आहे. खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या सहकार्याने ‘खासदार केसरी कुस्ती दंगल-२०२५’ चे आयोजन १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे मैदान, शिवाई व्यायाम शाळा, पूनम नगर, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित कुस्तीपटू सहभागी होणार असून, प्रथमच अशा प्रकारची कुस्ती (Wrestling) स्पर्धा या लोकसभा क्षेत्रात रंगणार आहे.
या दंगलीत पुरुष गटात २४ आणि महिला गटात ४ सामने होणार आहेत. आशिष हुड्डा (भारत केसरी, दिल्ली), पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, कोल्हापूर), कुसुम दहिया (हरियाणा केसरी), आणि प्रतीक्षा बागडी (महिला महाराष्ट्र केसरी, सांगली) यांसारखे दिग्गज कुस्तीपटू आपले कसब आजमावणार आहेत. याशिवाय, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, सोलापूर, सांगली, जोगेश्वरी, जळगाव, पठाणवाडी, माटुंगा, रेल्वे आखाडा, आणि आर्मी पुणे येथील पुरुष कुस्तीपटू, तसेच हरियाणा, पुणे, घाटकोपर, आणि विक्रोळी येथील महिला कुस्तीपटू (Wrestling) सहभागी होणार आहेत. या वैविध्यपूर्ण सहभागामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
(हेही वाचा – Asian Games in India : पहिल्या वहिल्या आशियाई क्रीडास्पर्धा भारतातच झाल्या होत्या तुम्हाला ठाऊक आहे का?)
पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना चांदीची गदा आणि जाहीर रोख रक्कम पुरस्कार म्हणून प्रदान केली जाईल. रविंद्र दत्ताराम वायकर (Ravindra Waikar) प्रतिष्ठानच्या वतीने आणि कुस्ती राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते नरसिंग यादव (Narsingh Yadav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी या स्पर्धेद्वारे कुस्ती (Wrestling) खेळाला प्रोत्साहन देण्याचा आणि स्थानिक जनतेला दर्जेदार क्रीडा अनुभव देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
“मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North-West Loksabha) क्षेत्रातील जनतेला कुस्तीचा (Wrestling) हा अनोखा थरार अनुभवता यावा, यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. देशातील नामांकित कुस्तीपटूंच्या लढती येथे पाहायला मिळतील,” असे वायकर यांनी सांगितले. या स्पर्धेमुळे कुस्तीप्रेमींसह स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी सर्वतोपरी तयारी केली असून, कुस्तीप्रेमींसाठी (Wrestling) हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community