WTC Final: भारताची थेट फायनलमध्ये धडक; श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून पराभव

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने 8 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात किवी संघाचा दमदार फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमन्सने नाबाद 121 धावांची दमदार इनिंग खेळली. अखेरच्या षटकात न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाला मोठा दिलासा दिला आहे.

( हेही वाचा: विराटचे ७५ वे शतक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कसोटी… )

 

श्रीलंकेची झुंज व्यर्थ

सामन्यात आधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी करुणारत्नेच्या 50, कुसल मेंडिसच्या 87 आणि मॅथ्यूस धनंजय यांच्या 47, 46 या धावसंख्येमुळे श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलच्या 102 आणि लॅथमच्या 67 धावांसह मॅट हेर्नीत्या 75 धावांमुळे न्यूझीलंडने 373 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाच्या दुस-या डावात अनुभवी अष्टपैलू अॅंजेलो मॅथ्यूजने 115 धावांची शानदार खेळी करत अडचणीतून बाहेर पडण्याचे काम तर केले शिवाय अधिक चांगले लक्ष्यही दिले.

याशिवाय दिनेश चंडीमलने 42 तर धनंजया डी सिल्वाने 47 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे न्युझीलंडकडून श्रीलंका संघाच्या दुस-या डावात ब्लेअर टिकनर आणि मॅच हेन्री यांनी गोलंदाजीत अनुक्रमे 4 आणि 3 बळी घेतले. त्याचबरोबर कर्णधार टीम साऊदीनेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याआधी सामन्यात, पहिल्या डावात 373 धावा करुन न्यूझीलंडने श्रीलंकन संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येवरुन थोडीशी आघाडी घेतली होती. दरम्यान, आता दिवसाचा खेळ संपताना न्यूझीलंडची स्थिती 28 वर 1 बाद अशी होती. मग त्यानंतर केन विल्यम्सनच्या नाबाद 121 आणि डॅरिल मिचेलच्या 81 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 8 गडी गमावत 286 धावा केल्या आणि सामना दोन विकेट्सनी जिंकला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here