Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून उपान्त्य फेरीत खेळणार

चॅम्पियन्स करंडकातून ऐन वेळी यशस्वीला डच्चू मिळाला आहे.

63
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून उपान्त्य फेरीत खेळणार
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून उपान्त्य फेरीत खेळणार
  • ऋजुता लुकतुके

भारताने १२ फेब्रुवारीला चॅम्पियन्स करंडकासाठीच्या (Champions Trophy) संघात दोन बदल केले. यात जखमी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऐवजी हर्षित राणाचा (Harshit Rana) संघात समावेश झाला. तर वरुण चक्रवर्तीसाठी सलामीवीर यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) बाहेर जावं लागलं. जयस्वालला वगळण्याचा निर्णय काहीसा आश्चर्यकारक होता. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्यानंतर स्पष्ट केलं की, ‘आम्हाला प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करू शकेल असा खेळाडू संघात हवा होता. त्यामुळे वरुणची निवड झाली. आणि यशस्वी बाहेर जावं लागतंय. पण, यशस्वी (Yashasvi Jaiswal) चांगला फलंदाज आहे. आणि वय त्याच्या बाजूने आहे. त्याला पुढे चांगली संधी मिळेल.’ या धक्क्यानंतर आता यशस्वीने रणजी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो मुंबईकडून उपान्त्य फेरीच्या लढतीत खेळताना दिसणार आहे. मुंबईने विदर्भाविरुद्ध संघाची घोषणाही केली आहे. आणि यात यशस्वीचं नाव आहे.

मुंबई संघाने उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणा संघाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. येत्या १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मुंबई आपला उपान्त्य फेरीचा सामना विदर्भविरुद्ध खेळणार आहे.

(हेही वाचा – PM America Visit : अमेरिका भारताला देणार घातक फायटर विमान; पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात मार्ग प्रशस्त)

२०२४-२५ च्या रणजी हंगामाचा पहिला उपांत्य सामना मुंबई आणि विदर्भ असा होईळ. तर दुसरा उपांत्य सामना गुजरात आणि केरळ संघात अहमदाबाद इथं होणार आहे. या हंगामाचा अंतिम सामना २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान होईल.

(हेही वाचा – Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा)

मुंबईने उपान्त्य लढतीसाठी आपला संघ जाहीर केला असून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचं नेतृत्व करणार आहे. यशस्वी (Yashasvi Jaiswal) आणि शिवम दुबे (Shivam Dubey) या संघात असले तरी चॅम्पियन्स करंडकासाठी ते राखीव खेळाडू आहेत. ते दुबईला जाणार नाहीत. पण, संघाला ऐनवेळी गरज पडल्यास त्यांना पाठवलं जाईल. रणजी उपान्त्य सामन्यासाठी मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, अंगक्रिष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे, सुर्यांश शेडगे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसुझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर व हर्ष टन्ना.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.