- ऋजुता लुकतुके
झिंबाब्वे विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात यशस्वी जयसवाल ५ चेंडूंत १२ धावा करून बाद झाला. पण, या कामगिरीतही एक अनोखा आणि आधी फक्त एकदाच झालेला विक्रम त्याने सर केला. टी-२० सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार लगावणारा यशस्वी फक्त दुसरा फलंदाज आहे. झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वीने मिटविकेटच्या वरून जोरदार षटकार लगावला. पण, हा चेंडू नो-बॉलही होता. त्यामुळे मिळालेल्या फ्री हिटवर यशस्वीने सरळ रेषेत आणखी एक षटकार लगावला. भारताने एकाच चेंडूत १३ धावा वसूल केल्या. (Yashasvi Jaiswal)
दुर्दैवाने यशस्वीची ही खेळी छोटेखानी ठरली. पाचव्या चेंडूवर सिकंदर रझाने त्याला त्रिफळाचीत केलं. (Yashasvi Jaiswal)
.@ybj_19 started the final T20I of the Zimbabwe tour with a flourish 💥💥#SonySportsNetwork #ZIMvIND #TeamIndia | @BCCI pic.twitter.com/7dF3SR5Yg1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 14, 2024
(हेही वाचा – Euro Cup 2024 : स्पेनची इंग्लंडवर २-१ ने मात)
याने केली होती २०२२ मध्ये अशी कामगिरी
रझाचा पाचवा चेंडू त्याने यॉर्कर टाकला होता. तो यशस्वीच्या चवड्याजवळ पडला आणि खाली राहिलेला हा चेंडू यशस्वीला थांबवता आला नाही. त्याचा लेग स्टंप उखडला गेला. तरीही यशस्वीने या मालिकेत ३ सामन्यांत १४१ धावा केल्या त्या ७० च्या सरासरीने. सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार हा अनोखा विक्रम आहे. आणि क्रिकेटच्या इतिहासात असं फक्त दुसऱ्यांदा घडलंय. आयसीसीची कसोटी मान्यता असलेल्या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात तर अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली आहे. (Yashasvi Jaiswal)
यशस्वी खेरीज टांझानियाच्या इव्हान सेलेमनीने यापूर्वी २०२२ मध्ये अशी कामगिरी केली आहे. रवांडाच्या मार्टिन अकायेझूविरुद्ध त्याने ही कामगिरी बजावली आहे. तर इंग्लंडच्या फिल सॉल्टने लगावलेले दोन षटकार हे धावांचा पाठलाग करताना म्हणजे दुसऱ्या डावात केले आहेत. (Yashasvi Jaiswal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community