Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मुंबई सोडली? पुढील हंगामात गोव्याकडून खेळणार?

पुढील हंगामात तो गोव्याचं नेतृत्व करणार असल्याचं समजतंय.

70
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मुंबई सोडली? पुढील हंगामात गोव्याकडून खेळणार?
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मुंबई सोडली? पुढील हंगामात गोव्याकडून खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल किंवा क्लब क्रिकेटमध्ये जशी खेळाडूंची पळवापळवी होते, तसं काहीसं रणजी स्पर्धेत घडताना दिसत आहे. भारतीय कसोटी संघातील सलामीवीर आणि मुंबई संघाचा खंदा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) पुढील हंगामापासून गोव्याकडून खेळणार असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. २०२५-२६ हंगामात तो गोवा रणजी संघाचं नेतृत्व करणार आहे. ‘यशस्वी गोव्याकडून खेळणार हे नक्की आहे. तो काही दिवसांतच मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल,’ असं एमसीएमधील सूत्रांनी टाईम्स समुहाशी बोलताना सांगितलं. २३ वर्षीय यशस्वीने २०१९ च्या हंगामात छत्तीसगड विरुद्ध रणजी पदार्पण केलं होतं. आतापर्यंत मुंबईसाठी ३६ प्रथमश्रेणी सामने खेळताना त्याने १२ शतकं आणि १२ अर्धशतकांसह ३,७१२ धावा केल्या होत्या.

उत्तर प्रदेशच्या बदोही गावात जन्मलेला यशस्वी (Yashasvi Jaiswal) शाळकरी वयातच मुंबईत क्रिकेटसाठी आला. आणि तेव्हापासून आझाद मैदानातील मुस्लिम युनायटेड एससी या क्लबच्या तंबूत राहून त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. आझाद मैदानावरच (Azad Maidan) संध्याकाळच्या वेळेत पाणीपुरी विकून त्याने दिवस काढले आहेत. तिथले प्रशिक्षक ज्वाला सिंग (Jwala Singh) यांची नजर त्याच्यावर गेली तिथून त्यांनी यशस्वीला आपल्या घरी नेलं. यशस्वीची क्रिकेट कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि मुंबईतच घडली आहे. असं असताना त्याचा हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटत आहे.

(हेही वाचा – Donald Trump Tariff War : अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के आयात शुल्क, भारत काय उत्तर देणार?)

मुंबईत शालेय क्रिकेट खेळताना केलेल्या मोठ्या धावसंख्यांमुळे यशस्वीवर सगळ्यांची नजर गेली. रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून १६ वर्षांखालील गटात यशस्वीने धावांचा रतीब धातला. आणि त्या जीवावर मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवलं. गेल्या हंगामात यशस्वी (Yashasvi Jaiswal) भारतीय संघाकडून खेळण्यात व्यस्त होता. ऑस्ट्रलियातील बोर्डर – गावसकर चषकात भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करताना त्याने १ शतक आणि १ अर्धशतकासह ३९१ धावा केल्या होत्या.

२०२४-२५ हंगामात तो मुंबईकडून एकमेव रणजी सामना जम्मू व काश्मीर संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.  यशस्वीने दोन्ही डावांत अनुक्रमे ४ आणि २२ धावा केल्या होत्या. यशस्वीला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्याचं श्रेय तेव्हाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) दिलं जातं. यशस्वी (Yashasvi Jaiswal) मुंबई सोडून गोव्याकडे का जातोय, ते मात्र अजून समजलेलं नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.