-
ऋजुता लुकतुके
१३ वर्षीय गोल्फपटू कार्तिक सिंगने इतिहास रचला आहे. एशिया-पॅसिफिक या मानाच्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत खेळण्याचा मान त्याने पटाकवलाय तो १३ व्या वर्षीच. (Youngest Indian Golfer)
गोल्फमध्ये एशिया-पॅसिफिक हौशी विजेतेपद स्पर्धा ही मानाची समजली जाते आणि या स्पर्धेत यंदा स्पर्धेच्या इतिहासातील सगळ्यात तरुण गोल्फपटू तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्याचं नाव आहे कार्तिक सिंग आणि हा भारतीय गोल्फपटू फक्त १३ वर्षं ९ महिने आणि २२ दिवसांचा आहे. (Youngest Indian Golfer)
गोल्फमध्ये पहिल्या दोन फेऱ्या खेळल्यानंतर खेळाडू आगेकूच करणार की नाही हे ठरतं. गुणतालिकेत तळाच्या खेळाडूंना तिथेच निरोप दिला जातो. बाकीचे पुढच्या जास्त आव्हानात्मक आणि महत्त्वाच्या फेऱ्या खेळण्यासाठी सिद्ध होतात. या प्रकाराला ‘मेक द कट’ असं म्हटलं जातं आणि मेक द कट ही महत्त्वाची कामगिरी मानली जाते. कारण, इथून पुढे मुख्य स्पर्धा सुरू होणार असते. (Youngest Indian Golfer)
एशिया-पॅसिफिक स्पर्धेत कार्तिकने आपली आगेकूच सुरू ठेवताना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ७ ओव्हर पार ७८ आणि पार ७२ असे गुण कमावले आणि तिथेच त्याचा मुख्य फेरीतील प्रवेश नक्की झाला. ही कामगिरी करताना कार्तिकने चीनच्या गुआन तियानलँगचा विक्रम मागे टाकला आहे. (Youngest Indian Golfer)
गुआनने २०१२ मध्ये १४ व्या वर्षी या स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. गुआन पुढे जाऊन पीजीए टूअरवरही यशस्वी ठरला. आताच्या स्पर्धेतही कार्तिक आणि गुआन आमने सामने होते. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या फेरीत मात्र गुआनने कार्तिकला पुढे जाऊ दिलं नाही. दिवसाच्या शेवटी कार्तिक अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्याच झेंग सॅम्पसन या खेळाडूपेक्षा २१ शॉट मागे राहिला. (Youngest Indian Golfer)
आशिया-पॅसिफिक या स्पर्धेत कार्तिकला आणखी दोन महत्त्वाच्या संधी मिळू शकतील. तिथे यशस्वी झाला तर कार्तिक ऑगस्ता मास्टर्स आणि ऑगस्ता खुल्या स्पर्धेसाठीही आपोआप निवडला जाईल. त्या स्पर्धांचं निमंत्रणही त्याला मिळेल. सहाव्या वर्षी गोल्फ खेळायला सुरुवात करणाऱ्या कार्तिकने या स्पर्धेतील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. (Youngest Indian Golfer)
‘मी इथं कुठल्याही अपेक्षेनं आलो नव्हतो. या मानाच्या स्पर्धेविषयी मी खूप ऐकून होतो. त्यामुळे मला एकदा अनुभव घ्यायचा होता. काही उद्दिष्टं असेलच तर ते तिसऱ्या फेरीत पोहोचण्याचंच होतं. ते पूर्ण झाल्यामुळे मी खुश आहे,’ असं कार्तिकने मीडियाशी बोलताना सांगितलं. कार्तिक बरोबरच मलेशियाचा १४ वर्षीय अँड्र्यू यापही या स्पर्धेत खेळत होता. पण, तो कट मिळवू शकला नाही. (Youngest Indian Golfer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community