Yusuf Pathan : डावखुरा आक्रमक फलंदाज युसुफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर

कोलकात्यात मुर्शिदाबाद इथं युसुफ पठाणने तृणमूलच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.

166
Yusuf Pathan : डावखुरा आक्रमक फलंदाज युसुफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर
Yusuf Pathan : डावखुरा आक्रमक फलंदाज युसुफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर
  • ऋजुता लुकतुके

गुजरातमध्ये बडोद्यात ‘पठाण बंधू’ या नावाने प्रसिद्ध असलेले इरफान पठाण आणि युसुफ पठाण (Yusuf Pathan) हे बंधू आजही चर्चेत आहेत. इरफान पठाण निवृत्तीनंतर क्रिकेटमध्ये समालोचन कक्षात दिसतो. तर युसुफ पठाणने (Yusuf Pathan) या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत चक्क राजकीय मैदानात पाऊल ठेवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथं युसुफने ७०,००० पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे.

युसुफ पठाण २००७ मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. आणि अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर २००८ चं पहिलं आयपीएलही त्याने गाजवलं होतं. तेव्हापासून मोठ्या सामन्यातील खेळाडू अशी त्याची ओळख आहे. आणि आता राजकीय पटलावरही त्याने तीच ओळख जपली आहे.

(हेही वाचा – Lok sabha Election 2024 : १६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, नेमके कोणाचे ? जाणून घ्या)

‘अल्लाचा आशीर्वाद आणि दया यामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. मी मोठ्या क्षणांचा, मोठ्या विजयाचा भाग असतो. आताही तसंच झालंय. पण, मी काही राजकीय नेता नाही. तृणमूलने मला संधी दिली. आता माझ्या मतदारसंघात काम करणार,’ असं युसुफ पठाणने (Yusuf Pathan) बोलून दाखवलं आहे. ४१ वर्षीय युसुफ पठाणचा राजकारणातील प्रवेश ही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा मास्टरस्ट्रोक मानला जातो.

युसुफ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. इथंही एकदा राजस्थान आणि नंतर कोलकाताकडून तो दोनदा आयपीएल विजेत्या संघाचा सदस्य होता. कोलकाता संघाचा विजय मैदानात साजरा करत असताना ममता दीदींनी २०१२ आणि मग २०१४ मध्ये युसुफला पहिल्यांदा पाहिलं. प्रेक्षकांचा त्याला असलेला पाठिंबाही त्यांनी जवळून अनुभवला. आणि २०२४ च्या निवडणुकीची तयारी करताना त्यांना युसुफची आठवण आली. कारण, तोपर्यंत युसुफ क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.

(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!)

तृणमूल काँग्रेस आपल्या बंगालमधील उमेदवारांची यादी जाहीर करणार, त्याच्या फक्त एक आठवडा आधी युसुफने ममता दीदींचा प्रस्ताव स्वीकारला. पण, एकदा तो स्वीकारल्यावर त्याचा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मंत्र ‘खेला होबे,’ त्याने प्राणपणाने जपला. ममता दीदीही राजकारणात याच मंत्रासाठी प्रसिद्ध आहेत. युसुफ पठाणने हे आव्हान स्वीकारलं. आणि इथून सलग पाचदा निवडून आलेले अधिररंजन चौधरी यांचा पराभव केला.

१९८२ चा जन्म असलेला युसुफ पठाण २००७ चा टी-२० आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. आता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या विजयाचाही तो साक्षीदार झाला आहे. (Yusuf Pathan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.