अभिनंदन… युवराज सिंगला पुत्ररत्न

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची पत्नी हेजल कीचने एका मुलाला जन्म दिला आहे. या सेलिब्रिटी जोडप्याने 25 जानेवारीच्या रात्री आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.

युवराज सिंगचे ट्विट

युवराज सिंगने ट्विटरवर लिहिले की, ‘आमचे सर्व चाहते, कुटुंब आणि मित्रांनो, आम्हाला ही बातमी सांगताना खूप आनंद होत आहे, की देवाने आम्हाला मुलगा दिला आहे. याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो आणि आशा करतो की या छोट्याशा जीवाचे या जगात स्वागत करताना, आमच्या गोपनीयतेची काळजी घेतली जाईल. बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हाच संदेश पोस्ट केला आहे.

इरफान पठाणने केले अभिनंदन 

या आनंदाच्या बातमीनंतर युवराज सिंग आणि हेजल कीच यांचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदन केले जात आहे. युवीचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने लिहिले की, ‘खूप खूप अभिनंदन. मला खात्री आहे की तू एक अद्भुत पिता आहेस. छोट्याला खूप प्रेम.

2016 मध्ये झालं लग्न 

युवराज सिंग आणि हेजल कीच यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. 30 नोव्हेंबर 2016 रोजी फतेहगढ साहिब गुरुद्वारामध्ये या जोडप्याचा विवाह झाला.

( हेही वाचा: 15 ऑगस्ट अन् 26 जानेवारी या दोन दिवसांचे काय आहे वेगळेपण? जाणून घ्या…)

युवी हा चॅम्पियन क्रिकेटर

भारताच्या यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंगची गणना केली जाते. तो T20 वर्ल्ड कप 2007 आणि ODI वर्ल्ड कप 2011 च्या चॅम्पियन टीमचा भाग होता. 10 जून 2019 रोजी या चॅम्पियन खेळाडूने ‘जंटलमन्स गेम’ला निरोप दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here