Yuvraj Singh Celebration : ‘भारतीय चॅम्पियन्स’चा नाच सोशल मीडियावर का होतोय व्हायरल?

Yuvraj Singh Celebration : भारताच्या चॅम्पियन्स संघाने पाकिस्तानचा पराभव करत चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धा जिंकली. 

142
Harbhajan Apologizes : दिव्यांगांची नक्कल करणाऱ्या व्हिडिओवरून युवराज, हरभजन आणि रैनाविरुद्ध पोलीस तक्रार
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या टी-२० संघाने विश्वचषकात मिळवेला विजय ताजा असतानाच चॅम्पियन्स संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाक चॅम्पियन्सचा पराभव करत चॅम्पियन ऑफ लिजंड्स स्पर्धा जिंकली आहे. या विजयानंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये केलेला जल्लोष सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातही भारतीय कर्णधार युवराज सिंगने केलेला ‘तौबा तौबा’ नाच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Yuvraj Singh Celebration)

युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरैश रैना यांचा नाचतानाचा हा व्हिडिओ आहे. विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्यावर तिघं नाचतानाचा हा व्हिडिओ युवराज सिंगनेच इन्स्टाग्रामवर टाकला आहे. जवळ जवळ १० लाख लोकांनी तो लाईक केला आहे. युवराजने तर या व्हिडिओसाठी विकी कौशललाही टॅग केलं आहे. (Yuvraj Singh Celebration)

(हेही वाचा – Rohit Sharma : ‘मी खेळत राहणार जोपर्यंत….,’ रोहितने निवृत्तीची चर्चाच फेटाळली)

या गाण्याबरोबरच युवराज सिंगने लिहिलेला संदेशही वाचण्यासारखा आहे. ‘१५ दिवसांत आटोपलेल्या या स्पर्धेमुळे शरीर तौबा तौबा म्हणत आहे. एक असा अवयव नाही जो सुजला नाहीए. आम्ही या नाचात विकी कौशल आणि त्याच्या सहकाऱ्यांना आव्हान देत आहोत,’ असं युवराजने म्हटलं आहे. चॅम्पियन ऑफ लिजंड स्पर्धेत भारताच्या चॅम्पियन संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत एजबॅस्‌टन इथं ही स्पर्धा जिंकली. (Yuvraj Singh Celebration)

२० षटकांच्या या सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत ६ बाद १५६ धावा केल्या. शोएब मलिकने ४१ धावा केल्या. तर भारताकडून अनुरित सिंगने ३ बळी मिळवले. या धावसंख्येला उत्तर देताना १९.१ षटकांत ही धावसंख्या पार केली. अंबाती रायडूने ५० तर गुरुकिरत सिंगने ३४ धावा केल्या. भारताने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन चॅम्पियन आणि इंग्लिश चॅम्पियन संघाचाही पराभव केला. (Yuvraj Singh Celebration)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.