शुभमन गिल (Shubman Gill) पंजाबमध्ये युवराजच्या तालमीत वाढला. त्याने तगडे प्रशिक्षण देखील घेतले. आयपीएल गाजवली आणि आता त्याला वर्ल्ड कपमध्ये देखील संधी मिळाली. अशातच वर्ल्ड कपच्या आधीच त्याला डेंग्यू झाल्याची माहिती मिळाली आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. आजारातून उठून शुभमन गिल (Shubman Gill) खेळणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच डेंग्यूला कुरवाळत बसलेल्या शुभमन गिलची युवराज सिंहने कानउघाडणी केली.
काय म्हणाला युवराज सिंह?
कॅन्सरशी झुंज देताना मी विश्वचषक खेळलो होतो, कॅन्सर असताना देखील मी संघात येण्यासाठी पटकन तयार झालो. त्याला मी तगडा केला आहे. मला आशा आहे की, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तयार असेल. जेव्हा तुम्हाला ताप आणि डेंग्यू असतो तेव्हा क्रिकेट सामना खेळणे खरोखर कठीण असते आणि मी ते अनुभवले आहे. त्यामुळे मला आशा आहे की तो तंदुरुस्त असेल तर तो नक्कीच खेळेल, असा विश्वास युवराज सिंहने (Yuvraj Singh On Shubhman Gill) व्यक्त केला आहे.
(हेही वाचा IND VS PAK : बाबर आझमने दिले आव्हान; अहमदाबादमध्ये तापले वातावरण)
Join Our WhatsApp Community