-
ऋजुता लुकतुके
भारताचा माजी डावखुरा तेज गोलंदाज झहीर खान पुढील हंगामात आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर असणार आहे. यापूर्वी गौतम गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता. यंदाच्या हंगामातच गौतम गंभीर लखनौकडून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे गेला होता. तिथे कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची वर्णी लागली आहे. (Zaheer Khan)
(हेही वाचा- २९ ऑगस्ट रोजी National Sports Day कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?)
लखनौ फ्रँचाईजी मागचे काही दिवस झहीरशी चर्चा करत असल्याची चर्चा सुरू होती. पण, नुकताच लखनौ फ्रँचाईजीचे मालक संजीव गोयंका यांच्या मुख्य कार्यालयात कोलकाता इथं झहीर हजर झाला तेव्हा चर्चा प्रत्यक्षात येत असल्याची खात्री पटली. कोलकाता इथंच झहीरचा फ्रँचाईजीबरोबरचा करार पार पडला. त्याला ३४ क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली. सध्या जस्टिन लँगर हा लखनौ संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तर लान्स क्लूसनर आणि ॲडम व्होगस हे सहाय्यक प्रशिक्षक आहे. या ताफ्यात आता ४५ वर्षीय झहीर खान सामील होणार आहे. (Zaheer Khan)
Welcome to the Super Giants family, Zak! 💙 pic.twitter.com/0tIW6jl3c1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
२०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा झहीर हा मुख्य सदस्य होता. आयपीएलमध्ये मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली अशा तीन फ्रँचाईजीकडून तो खेळला आहे. यात १०० सामने खेळताना त्याने ७.५८ च्या धावगतीने १०२ बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये यापूर्वी झहीर खान २०१८ ते २०२२ या कालावधीत मुंबई इंडियन्सशी जोडला होता. तो फ्रँचाईजीचा क्रिकेट संचालक होता. तसंच जागतिक क्रिकेट विकास अधिकारीही होता. (Zaheer Khan)
Welcome to the Super Giants family, Zak! 💙 pic.twitter.com/0tIW6jl3c1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
लखनौ सुपर जायंट्स हा संघ संजीव गोयंका यांच्या मालकीचा आहे. २०२२ मध्ये ७०९० कोटी रुपयांना त्यांनी विकत घेतला आहे. लखनौमधील एकाना स्टेडिअम हे फ्रँचाईजीचं मैदान आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये संघाने के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली बाद फेरी गाठली. पण, त्यानंतर यंदाच्या हंगामात संघ आधीच गारद झाला. (Zaheer Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community