दिवाळीच्या दिवसात शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे अनेकांनी गावची वाट धरली तर काहीजण फिरायला जातात. यावेळी सामान्य नागरिकांनी खासगी बसच्या अनियमित दरांमुळे एसटी प्रवासाला पसंती दिली. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने दिवाळीच्या पाच दिवसात या वाहतुकीच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. भाऊबीज या बहिण-भावाच्या सणाला दिवाळीत विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यादिवसात एसटीला सर्वाधिक ५५ लाख ५२ हजार २३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
( हेही वाचा : “…ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही, चोराच्या उलट्या बोंबा”; विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा भाजपची मागणी)
प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुद्धा दिवस-रात्र काम केले यामुळे दिवाळीच्या या ५ दिवसांमध्ये एसटीच्या उत्पन्नात भर पडली. दिवाळीनिमित्त राज्यातील एसटीच्या नियमित आणि विशेष वाहतुकीलादेखील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
एसटीची दिवाळी आनंदात
तारीख – उत्पन्न ( रुपये )
- २२ ऑक्टोबर – ५० लाख २१ हजार रुपये
- २३ ऑक्टोबर – ४९ लाख ६० हजार रुपये
- २४ ऑक्टोबर – ४१ लाख ९१ हजार रुपये
- २५ ऑक्टोबर – ४७ लाख १३ हजार रुपये
- २६ ऑक्टोबर – ५५ लाख ४२ हजार २३५ रुपये
- एकूण – २ करोड ४४ लाख २७ हजार २३५ रुपये