PMP च्या ई-डेपोतून २५ टक्के सीएनजी बस धावणार !

PMP च्या ई-डेपोतून २५ टक्के सीएनजी बस धावणार !

778
PMP च्या ई-डेपोतून २५ टक्के सीएनजी बस धावणार !
PMP च्या ई-डेपोतून २५ टक्के सीएनजी बस धावणार !

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Metropolitan Transport Corporation) (PMP ) ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस (CNG buses) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भेकराईनगर ई-डेपोमधून (e-depot) सीएनजी बस सुरू केल्या आहेत. काही वेळा चार्जिंगची समस्या निर्माण होते. त्यावेळी सीएनजी बस सोडण्यात येणार आहे. पीएमपीचे सध्या पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो आहेत. (PMP )

हेही वाचा-RSS headquarters : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवादी रईस शेखचा जामीन अर्ज फेटाळला

या डेपोमधून सध्या ४९० ई-बसचे संचलन चालते. पण, काही ई-बस जुन्या झाल्या आहेत. तसेच, चार्जिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे दुपारच्या टप्प्यात ई-बस फेऱ्यांना उशीर होतो. तसेच, काही फेऱ्यादेखील अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी ई-डेपोतील सेवा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तिथे २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करून त्या ठिकाणाहून चालविण्याच्या सूचना दिल्या होत्या. (PMP )

हेही वाचा- Bombay High Court ने पोलिसांना फटकारले; म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांविषयीचा कारभार सुधारा’

पीएमपीकडून पहिल्या टप्प्यात भेकराईनगर येथील ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट केल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या सीएनजी बसचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बाणेर, निगडी डेपोमध्येदेखील लवकरच २५ टक्के सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर ई-डेपोमध्ये सीएनजी बस सुरू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे ई-बस बंद पडल्यास प्रवाशांना अडचण येणार नाही. (PMP )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.