ऐन दिवाळीच्या दिवसात बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी अचानक संप पुकारला होता. या मागण्या मान्य न झाल्यामुळे दिवाळीतच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शनिवार आणि रविवारी मुंबईतील सांताक्रुझ आणि जोगेश्वरी आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. मात्र यानंतर अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – BEST च्या कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन, ‘या’ मागण्यांसाठी पुकारला संप)
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ७ हजार ५०० रूपयांचा बोनस मिळणार असून त्याबाबत बेस्टच्या कंत्राटी कंपनी मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. मातोश्री ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेखी आश्वासन देऊन बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आजपासून सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
काल शनिवारी मुंबईतील सांताक्रुझ बस डेपोतील ३०० कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर गेलेत. पहाटे ५ वाजेपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला यानंतर या डेपोमधून एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. यानंतर आज, रविवारी मजार डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता होती.
Join Our WhatsApp Community