बिहारमध्ये (Bihar) ट्रक आणि टेम्पोमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident News) घडला आहे. हा अपघात रविवारी(२३ फेब्रुवारी) रात्री उशिरा पाटणा (Patna) येथील मसौरी पोलीस स्टेशन परिसरात झाला. या अपघातात ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Accident News)
हेही वाचा-Telangana Tunnel मध्ये अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता धुसर; 11 किमी पाणी भरलं
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो आणि ट्रकच्या धडकेमुळे दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्यात पडले. टेम्पोमध्ये बसलेले सर्व लोक कामगार होते. हे लोक त्यांचे काम संपवून घरी परतत होते. पाटण्यात काम केल्यानंतर ते तारेग्ना स्टेशनवर उतरले. हे लोक येथून टेम्पोने घरी परतत होते. पिटवनहून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकचा एक्सल तुटला आणि ट्रकचा तोल गेला आणि तो टेम्पोला धडकला. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. यावेळी टेम्पोत तब्बल 10 मजूर प्रवास करत होते. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. (Accident News)
हेही वाचा-Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचा यलो अलर्ट
मृतांपैकी 4 जण दोरीपार गावातील, 2 जण बेगमचकचे होते, तर चालक हांसडीह गावातील रहिवासी होता, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात ठार झालेल्या मृतांची ओळख पटली असून सुशील राम, मेष बिंद, विनय बिंद, मतेंद्र बिंद, उमेश बिंद, उमेश बिंद आणि सूरज ठाकूर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. आठवा प्रवासी ट्रकखाली खोल पाण्याच्या खड्ड्यात अडकला होता. (Accident News)
हेही वाचा-Donald Trump यांनी USAID च्या २००० कर्मचाऱ्यांना रातोरात दिला नारळ
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी मजुरांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात अजून किती लोक जखमी किंवा मृत झाले आहेत? त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मसौरीच्या आमदार रेखा देवी यांनीही घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ठार झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी सरकारकडं केली आहे. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community