बेळगाव येथील काही जण मिनी बसने तिलारीमार्गे गोव्यात पर्यटनासाठी जात होते. (Accident News) तिलारी घाट (Tilari Ghat) उतरत असताना जयकर पॉईंट (Jaykar Point) येथील अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात झाला, मात्र बस धडकून तेथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. यात बसचे मोठे नुकसान झाले असले. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. (Accident News)
हेही वाचा- Delhi – Mumbai Expressway वर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, आज (1 डिसेंबर) रविवारी सकाळी हा अपघात झाला. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. हा ट्रक नेमका ज्या दिशेने दरी आहे, तेथील तुटलेल्या संरक्षक कठड्याला लागून उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला वेगात असलेली मिनी बस जाऊन आदळली. त्यामुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. (Accident News)
हेही वाचा- Ravindra Chavan: दिल्ली भेटीवर रविंद्र चव्हाणांनी ट्विट करत दिली महत्त्वाची माहिती
अपघातग्रस्त ट्रक नसता तर मोठा अनर्थ घडला असता. बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. त्यातील काहींना किरकोळ दुखापत झाली. त्यातीलच काहींनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बेळगाव येथील अन्य दोन वाहने बोलावून सर्वांना पुन्हा माघारी पाठविले. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. तिलारी घाट हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून या घाटातून लहान, मोठी वाहने परराज्यांत जातात. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community