दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असतात त्यामुळे बहुतांशा लोक फिरायला किंवा गावी जातात. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कोकण आणि गोव्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात. या दरम्यान रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल आधीच फुल्ल झालेले आहे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून सुद्धा जास्तीचे भाडेदर आकारले जातात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दिवाळीच्या निमित्ताने मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या दुमजली बसमधून अनुभवता येणार यंदाची दिवाळी पहाट )
कोकण-गोव्यासाठी अतिरिक्त गाड्या
- गाडी क्र. 01187 / 01188 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानक या दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहेत. ही गाडी १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी स्थानकांवर थांबेल.
- दुसरी गाडी क्र. 01185 / 01186 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान धावणार आहे. २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार येथे थांबून पुढे रवाना होईल.