संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. नवनवे विक्रम यंदा रचले जात आहेत. ५० कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. भाविक मिळेल त्या साधनाने प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रयागराजमध्ये (Prayagraj) आतापर्यंत एकूण ६५० चार्टर्ड विमाने (Chartered planes) येथे उतरली आहेत. (Mahakumbh)
हेही वाचा-कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी झापणे हे गुन्हेगारी कृत्य नाही ; Supreme Court चा निर्वाळा
हजारो सेलिब्रिटी, परदेशी राजदूत, व्हीआयपी लोक आणि नेते मंडळी चार्टर्ड विमानाने आले आहेत. चार्टर्ड फ्लाइट्स व्यतिरिक्त स्पाइसजेट, इंडिगो, एअर इंडियाच्या सुमारे ३०० नियमित फ्लाइट्स देखील आठवड्याला उतरत आहेत. सद्य:स्थितीत प्रयागराज विमानतळावर (Prayagraj airport) दररोज शंभरहून अधिक विमानांची वाहतूक होत आहे. (Mahakumbh)
प्रयागराजमध्ये दाखल होण्यासाठी भाविक रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाचा वापर करत आहेत. अनेक अडथळे पार करत हे भाविक महाकुंभमध्ये दाखल होत आहेत. काही भाविक हे खाजगी जेट किंवा चार्टर्ड विमानांनीही प्रयागराजमध्ये पोहचत आहेत. प्रयागराज विमानतळावर दररोज मोठ्या संख्येने चार्टर्ड आणि खाजगी जेट येत आहेत. यामुळे विमानतळ व्यस्त असून अनेकांना वाहने पार्क करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, विमानांच्या संख्येनेही नवा विक्रम रचला आहे. (Mahakumbh)
हेही वाचा-दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर Mahakumbh साठी आणखी 4 विशेष गाड्यांची घोषणा ; ‘येथून’ धावतील गाड्या
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात प्रयागराज विमानतळावर उतरणाऱ्या लोकांची संख्या ही सामान्य दिवसांमध्ये एका महिन्यात प्रयागराजमध्ये उतरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. प्रयागराज सध्या देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक बनले आहे. (Mahakumbh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community