Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!

50
Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!
Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (Maharashtra State Road Transport Corporation) लालपरी म्हणजेच एसटी बस (ST BUS) आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९२३२ बस निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. दरम्यान, नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार का ? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.  (Assembly Election 2024)

मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने एसटीकडे दोन दिवसांसाठी नऊ हजार बसची मागणी केली होती. १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर मतदान यंत्रे घेऊन जाण्यासाठी ८९८७ बस आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यासाठी तेवढ्याच गाड्यांची मागणी केली होती. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला २४५ बसदेखील देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – शरद पवारांनी नाकारली होती पुणेरी पगडी; Raj Thackeray यांनी दिला पुरावा) 

असा होणार एसटीला फायदा

लोकसभेला ज्या गाड्या दिल्या होत्या, त्या मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे त्यांचे भाडे ठरवण्यात आले होते. त्यावेळी एका बससाठी २४ ते ३० हजार रुपये एसटीला उत्पन्न मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याप्रमाणेच भाडेआकारणी होणार असल्याने तसाच फायदा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.