बांगलादेशातील ढाका येथून दुबईला जाणाऱ्या विमानाची बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरच्या (Nagpur) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवासी नागपुरात (Nagpur) खोळंबून बसले असून संबंधित विमान कंपनीकडून त्यांची व्यवस्था करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे नागपुरात (Nagpur) उतरवलेले हे विमान दुरुस्तीनंतर आज, गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती नागपूर (Nagpur) विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही यांनी दिली.
(हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर ? फोटो व्हायरल)
नागपूर (Nagpur) विमानतळाच्या टर्मीनल बिल्डींगजवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 396प्रवासी असून बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. यापूर्वी 10 नोव्हेंबर 2024 रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरहून (Nagpur) पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या (IndiGo Airlines) विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
याशिवाय 20 जून 2024 रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-343 या विमानाच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानुसार, विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लॅडिंग झाले. या वेळी प्रवाशांना विमानतळावर 9 तास मुक्काम करावा लागला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community