Best Bus: महायुती सरकारचा शपथविधी ठरला बेस्टसाठी फायदेशीर

539
महायुतीचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडला. यावेळी राज्यभरातून महायुतीचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याला (NDA Oath Ceremony) आझाद मैदानावर येण्यासाठी महायुतीने एसी, नॉन एसी अशा तब्बल ५८२ बसेस आरक्षित केल्या होत्या. यातून बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत एका दिवसात तब्बल ७५ लाखांचा महसूल जमा झाला आहे. (Best Bus) 
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला. २३ नोव्हेंबर रोजी निकाल झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी गुरुवारी आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आझाद मैदानावर ने-आण करण्यासाठी महायुतीने खासगी बसेससह बेस्ट उपक्रमाच्या बसेस आरक्षित केल्या होत्या. तसेच महायुतीने विशेष करून भाजपाने सर्वाधिक बेस्ट बसेस आरक्षित केल्या होत्या. बसेस आरक्षित करताना ७५ लाख रुपये बेस्ट उपक्रमाकडे जमा केले आहेत. 
(हेही वाचा – Mumbai Crime : साडेतीन कोटींच्या शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी तिघांना दिव्यातून अटक)
दारम्यान, शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, विविध राज्यांतील मुख्यमंत्री, बडे नेते, उद्योगपती, कलाकार, साधुसंत, लाडक्या बहिणी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.