Buldhana Accident : बुलढाण्यात तिहेरी अपघात ; 5 जण ठार, 26 जखमी

71
Buldhana Accident : बुलढाण्यात तिहेरी अपघात ; 5 जण ठार, 26 जखमी
Buldhana Accident : बुलढाण्यात तिहेरी अपघात ; 5 जण ठार, 26 जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात (Buldhana Accident) घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 26 हून अधिक जण जखमी आहेत. तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे. (Buldhana Accident)

हेही वाचा-देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या झाली अर्धी ; Amit Shah यांनी दिली माहिती

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Buldhana Accident)

हेही वाचा- Fishing Boats साठी मार्च महिन्यात १ लाख ६८ हजार कि. ली. डिझेल कोटा मंजूर

हा भीषण अपघात (Buldhana Accident) नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे. (Buldhana Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.