मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी! 9 महिन्यांत 62 जणांचे प्राण वाचवले

210

रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचारी नेहमीच रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास जागरुक राहतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवले आहेत.

( हेही वाचा : Solar Eclipse : सूर्यग्रहण कसे घडते? देशातील प्रमुख शहरांमध्ये ग्रहण किती वेळ दिसणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती)

“मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंत मध्य रेल्वेवर आतापर्यंत 62 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घातला. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या 62 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 24 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर विभागात 14 जण, पुणे विभागात 12 , भुसावळ विभागात 8 आणि सोलापूर विभागात 4 व्यक्तींचा जीव वाचवण्यात या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवतात.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, हिंसाचार, रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि रेल्वे तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवून देणे इत्यादी विविध प्रश्न सोडवावे लागतात. हे काम करतानाच आरपीएफच्या सतर्कतेमुळे धावत्या गाडीत चढ- उतार करणाऱ्या, तसेच आत्महत्या करण्यास आलेल्या नागरिकांचा जीव वाचला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.