Central Railway विस्कळीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

285
Central Railway वर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

मध्य रेल्वेवर (Central Railway) तांत्रिक बिघाड (technical issue) झाल्याने सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सध्या सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Central Railway)

(हेही वाचा-Violation of Code of Conduct च्या ५ हजार तक्रारी; ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त)

सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. (Central Railway)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.