नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरिस बहुतांश शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांना या कालावधीमध्ये विशेष गर्दी होती. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ४२ विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे.
कोकण-गोवा याठिकाणी जाणाऱ्या विशेष गाड्या
मुंबई – मंगळूरु साप्ताहिक स्पेशल (10)
- 01453 ही विशेष गाडी दिनांक ९ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ (५ सेवा) दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल.
- 01454 ही विशेष गाडी दिनांक १० डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ (५ सेवा) मंगळूर जंक्शन येथून दर शनिवारी १८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.२५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकींबिका रोड बैन्दूर कुंदापुरा, उडुपी आणि सुरथकल.
- संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन गार्ड ब्रेक व्हॅन डब्बे.
मुंबई – मडगाव साप्ताहिक विशेष (2)
- 01455 ही विशेष गाडी दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
- 01456 ही विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
- संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन आहेत.
नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या
पुणे – अजनी साप्ताहिक विशेषांक (१०)
- 01443 ही विशेष गाडी दिनांक ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ (५ सेवा) पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी १५.१५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
- 01444 ही विशेष गाडी दिनांक ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ (५ सेवा) पर्यंत दर बुधवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
- थांबे: दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
- संरचना: तेरा (१३) तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन.
मुंबई – नागपूर साप्ताहिक विशेष (१०)
- 01449 ही विशेष गाडी दिनांक ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ (५ सेवा) पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी २०.१५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता पोहोचेल.
- 01450 ही विशेष गाडी दिनांक ९ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ (५ सेवा) पर्यंत नागपूर येथून दर शुक्रवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
- थांबे: कल्याण, इगतपुरी (फक्त 01450 साठी), नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
- संरचना: एक प्रथम वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष (१०)
- 01451 ही विशेष गाडी दिनांक ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ (५ सेवा) पर्यंत दर बुधवारी नागपूर येथून १३.३०वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.
- 01452 ही विशेष गाडी दिनांक ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ (५ सेवा) पुणे येथून दर गुरुवारी रात्री १०.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
- थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
- सरचना: एक प्रथम वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन.
आरक्षण: विशेष गाड्या क्रमांक 01443/01444, 01449/01450, 01451/01452, 01453 आणि 01455/01456 यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे रेल्वेने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community