Summer Special Train 2025 : मध्य रेल्वे उन्हाळी सुट्टीत चालवणार विशेष गाड्या; ‘असे’ आहे नियोजन

83

मध्य रेल्वेने (Central Railway) आतापर्यंत २८४ अनारक्षित गाड्यांसह ११९८ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. (Summer Special Train 2025) मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २८४ अनारक्षित गाड्यांसह (unreserved trains) ११९८ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ११५६ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या फायद्यासाठी ४२ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवणार आहे.

(हेही वाचा – Political Party Funding : भाजपा, काँग्रेस, आप या राजकीय पक्षांना कोण देतं निधी? कुठल्या पक्षाला मिळाला सर्वाधिक निधी?)

कोणत्या स्पेशल ट्रेन चालवणार ?

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (१४ सेवा)

  • 01051 विशेष गाड्या दि. ११.०४.२०२५ ते दि. २३.०५.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता करमळी येथे पोहोचतील. (७ सेवा)
  • 01052 विशेष गाड्या दि. १२.०४.२०२५ ते दि. २४.०५.२०२५ पर्यंत शनिवारी करमळी येथून दुपारी २.३० वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचतील. (७ सेवा)

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम.

संरचना : आठ द्वितीय वातानुकूलित, दहा तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर व्हॅन.

पुणे – नागपूर – पुणे वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (१४ सेवा)

  • 01439 विशेष गाड्या दि. १२.०४.२०२५ ते दि. २४.०५.२०२५ पर्यंत दर शनिवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता नागपूर येथे पोहोचतील. (७ सेवा)
  • 01440 विशेष गाड्या दि. १३.०४.२०२५ ते दि. २५.०५.२०२५ पर्यंत रविवारी नागपूर येथून १६.१५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी ०७.२० वाजता पुणे येथे पोहोचतील. (७ सेवा)

    थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

    संरचना : आठ द्वितीय वातानुकूलित, दहा तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर व्हॅन.

    पुणे – हजरत हज़रत निजामुद्दीन – पुणे वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (१४ सेवा)
  • 01441 विशेष गाड्या दि. १५.०४.२०२५ ते दि. २७.०५.२०२५ पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी १८.१० वाजता हज़रत निजामुद्दीन येथे पोहोचतील. (७ सेवा)

  • 01442 विशेष गाड्या दि. १६.०४.२०२५ ते दि. २८.०५.२०२५ पर्यंत बुधवारी हज़रत निजामुद्दीन येथून २२.२० वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पुणे येथे पोहोचतील. (७ सेवा)

    थांबे : लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, नागदा जंक्शन, डकनिया तलाव, भवानी मंडी, सवाई माधोपुर, गंगापुर सिटी, मथुरा जंक्शन आणि पलवल

    संरचना : आठ द्वितीय वातानुकूलित, दहा तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर व्हॅन.

    आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 01051, 01439, 01440 आणि 01441 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ०८.०४.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर www.irctc.co.in वर सुरू होईल.

    अतिजलद मेल / एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित कोचसाठी अनारक्षित तिकीट सामान्य शुल्कासह तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील.

    या विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. (Summer Special Train 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.