Transport Day : मध्य रेल्वेने ६ महिन्यांत कसे कमावले २५० कोटी? कारण ऐकून थक्क व्हाल

141

मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२२ – २३ (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान, मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून ₹ २५०.४९ कोटी मिळवले. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेला प्राप्त झालेल्या रु. २४८.६७ कोटींच्या महसूलाच्या तुलनेत ₹ १.८२ कोटी अधिक आहेत.

( हेही वाचा : राहूल द्रविडसह, विराट-रोहितने सोडल्या बिझनेस क्लासच्या सीट्स; कारण वाचून तुम्ही सुद्धा कराल कौतुक )

सर्वाधिक महसूल 

भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने ₹ २५०.४९ कोटींचे महसूल प्राप्त केले आहे. कोणत्याही वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळतो असे नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत होत आहे. ते म्हणाले की, मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये निवडलेल्या सर्व भंगार साहित्याची विविध ठिकाणी विक्री करेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.