हिवाळ्याच्या सुटीत प्रवाशांची होणारी गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 01427 एकेरी विशेष गाडी सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी 12.15 वाजता पोहोचणार आहे.
Mumbai – Madgaon Superfast One-way special train on 7.11.2022. https://t.co/QBrhWiTAt1
— Central Railway (@Central_Railway) November 4, 2022
एकेरी विशेष ट्रेनचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमळी.
अशी असणार संरचना
१५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन
असे करा आरक्षण
01427 वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community