आता नाशिकमध्ये धावणार Compact Metro; सर्वेक्षणाला सुरुवात

Compact Metro च्या मार्गात एकूण सुमारे ४० स्थानके असतील, तसेच कॉम्पॅक्ट मेट्रो शहरातील सर्व महत्त्वाच्या भागांना जोडेल.

48

नाशिक (Nashik) शहरात कॉम्पॅक्ट मेट्रो (Compact Metro) धावणार आहे. सध्या अशी सेवा तैवान येथील ताईपाई येथे सुरू आहे. या मेट्रोसाठी रेल्वे मंत्रालयाचे (Ministry of Railways) अधिकारी नाशिकला दाखल झाले आहेत. पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात येणार आहे. कॉम्पॅक्ट मेट्रोच्या मार्गात एकूण सुमारे ४० स्थानके असतील, तसेच कॉम्पॅक्ट मेट्रो शहरातील सर्व महत्त्वाच्या भागांना जोडेल.

(हेही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात Shiv Sena चे राज्यभर आंदोलन)

यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिवांसह रेल्वेचे अधिकाऱ्यांची व्हिडियो मिटींग झाली. त्यात नाशिकचे विभागीय महसुल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, वाहतूक सेलचे प्रमुख राजेंद्र बागुल आदी अधिकारी सामील झाले होते. नाशिक शहरात लवकरच कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नव्याने आराखडा पाठविण्याचे आदेश शासनाने दिले आहे.

कॉम्पॅक्ट मेट्रोचे वजन १२ टन आहे. या मेट्रोची रुंदी २.६५ मीटर, तर लांबी २० मीटर असेल. कॉम्पॅक्ट मेट्रो पूर्ण वातानुकूलित असणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होईल आणि यासाठी १,६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली होती, मात्र आता खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbh Mela 2027) पूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. स्थानिक पातळीवरुन आता आराखडा कधी जातो, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाची घोषणा देखील करण्यात आली होती, मात्र आता ती कॉम्पॅक्ट मेट्रो रुपाने नाशिकला मिळणार आहे.

नाशिकची लोकसंख्या २५ लाख आहे. अनेक वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतूककोंडीची समस्याही वारंवार भेडसावत आहे. घरात नाशिकची लोकसंख्या पोहोचली असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी, अशी जोरदार मागणी होत होती. नाशिकमध्ये नियो मेट्रो सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता त्या जागी कॉम्पॅक्ट मेट्रो नाशिकला मिळणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.