दिवाळी विशेष गाड्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; वाचा संपूर्ण यादी

148

दिवाळीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देणार आहे.

नमूद केलेल्या दिवाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ 

  • ट्रेन क्र. 01025 ही दादर-बलिया त्रि-साप्ताहिक विशेष गाडी आता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत धावणार आहे.
  • ट्रेन क्रमांक 01026 ही बलिया-दादर त्रि-साप्ताहिक गाडी 02 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्रमांक 01027 दादर-गोरखपूर आठवड्यातून 4 दिवस धावणाऱ्या गाडीला 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
  • ट्रेन क्र. 01128 गोरखपूर-दादर आठवड्यातून 4 दिवस धावणाऱ्या गाडीला 01 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक 01033 मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी आता 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्रमांक 01034 नागपूर-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी आता 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्रमांक 01031 मुंबई-मालदा टाउन साप्ताहिक स्पेशल गाडीला 07 नोव्हेंबर2022 पर्यंत मुदतवाढ
  • ट्रेन क्र.01032 मालदा टाउन-मुंबई साप्ताहिक गाडीला 09 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
  • ट्रेन क्र.02105 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक गाडी आता 02 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्र.02106 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल गाडी 04 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्रमांक 01043 लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला आता 06 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
  • ट्रेन क्रमांक 01044 समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक गाडीला आता 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
  • ट्रेन क्रमांक 01139 नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आता 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहिल.
  • ट्रेन क्रमांक 01140 मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 01 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहिल.

आरक्षण : दादर, सीएसएमटी, नागपूर, एलटीटी आणि मडगाव येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या विस्तारित सहलींचे बुकिंग 23 ऑक्टोबरपासून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल, असे रेल्वेने सांगितले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.