Go First Airlines : ‘गो फस्टने एअरलाईन’ने जाहीर केली दिवाळखोरी

दोन दिवसांची म्हणजेच ३ मे आणि ४ मे या दिवसांची उड्डाणे तात्पुरता स्थगित करण्यात आली आहेत.

292
Go First Airlines
Go First Airlines : 'गो फस्टने एअरलाईन'ने जाहीर केली दिवाळखोरी

वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फस्ट’कडे (Go First Airlines) निधी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसांची म्हणजेच ३ मे आणि ४ मे या दिवसांची उड्डाणे तात्पुरता स्थगित करण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रीय कंपनी विधि न्यायधिकरणाच्या (एनसीएलटी) दिल्लीच्या खंडपीठापुढे दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्याचे मंगळवार २ मे रोजी स्पष्ट झाले.

(हेही वाचा – Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तास बंद राहणार)

दिवाळखोरीचे कारण

एनसीएलटीने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील, असे गो फस्टचे (Go First Airlines) मुख्य आधिकारी कौशिक खोना यांनी सांगितले. तसेच या विमानसेवेसेला निधीची चणचण का भासत आहे हे स्पष्ट केले.

विशेष इंजिन पुरवठा न केल्यामुळे या विमानसेवेच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे २८ विमाने जमिनीला खिळलेली आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

गो फस्टच्या (Go First Airlines) प्रवर्तकांनी गेल्या तीन वर्षात या विमानसेवेमध्ये ३२०० कोटी रूपयांचा भरीव निधी ओतल्यानंतरही हे पाऊल उचलणे कंपनीला अपरिहार्य ठरले आहे.

गो फस्ट (Go First Airlines) एअरबस ए ३० निओ विमानांच्या ताफ्यासाठी विशेष इंजिन पुरवठादार प्रॅट अॅंड व्हिटनी यांनी सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राने नियमांनुसार नियुक्त केलेल्या आपत्कालीन लवादाने दिलेल्या निवाड्याचे पालन करण्यास नकार दिला. त्यानंतर गो फस्टला एनसीएलटीकडे अर्ज करण्यास भाग पाडले.

हेही पहा –

डीजीसीएची नोटीस

विमान कंपनीने सरकारला घडामोडींची पूर्ण माहिती दिली आहे. विमान वाहतूक नियामक असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाकडे (डीजीसीए) तसा तपशीलवार अहवालदेखील सादर केला जाईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Go First Airlines)

पाच हजार पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या गो फस्टला गेल्या दोन महिन्यांपासून १० विमानांसाठी भाडेपट्टीची देय रक्कम भरता आलेली नाही, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Go First Airlines)

दरम्यान नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, अडचणीत असलेल्या गो फस्ट एअरलाईनला (Go First Airlines) शक्य ती सर्व मदत सरकार करत आहे. ते पुढे म्हणाले, ‘सरकार गो फर्स्टला शक्य ती सर्व मदत करत असून, संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवलं जात आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.