पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रे करीता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर – पंढरपूर, पंढरपूर – मिरज आणि सोलापूर – पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे.
( हेही वाचा : कोविड काळातील खर्चाचे महापालिकेचे ऑडीट कुठे? महापालिका संपुष्टात आल्यानंतर विभागानेही गुंडाळला कारभार )
कार्तिकी यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे…
१. लातूर – पंढरपूर स्पेशल (१० सेवा)
- गाडी क्रमांक 01419 ही विशेष गाडी दिनांक १ नोव्हेंबर २०२२, २ नोव्हेंबर २०२२, ४ नोव्हेंबर २०२२, ७ नोव्हेंबर २०२२ आणि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी लातूर येथून ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01420 पंढरपूर येथून दिनांक १ नोव्हेंबर २०२२, २ नोव्हेंबर २०२२, ४ नोव्हेंबर २०२२, ७ नोव्हेंबर २०२२ आणि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी पंढरपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.
- थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.
- संरचना : ८ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
२. पंढरपूर – मिरज स्पेशल (8 सेवा)
- गाडी क्रमांक 01421 पंढरपूर येथून दिनांक १ नोव्हेंबर २०२२, ५ नोव्हेंबर २०२२, ७ नोव्हेंबर २०२२ आणि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी ०९.२० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १२.०५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01422 विशेष गाडी मिरज येथून दिनांक १ नोव्हेंबर २०२२, ५ नोव्हेंबर २०२२, ७ नोव्हेंबर २०२२ आणि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी १३.१० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल.
- थांबे : सांगोला, वसूड, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सुलगरे आणि आरग.
- संरचना : ६ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
३. सोलापूर – पंढरपूर दैनिक डेमू (१६ सेवा)
- गाडी क्रमांक 01423 ही डेमू दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दररोज सोलापूर येथून १०.१० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01424 डेमू दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दररोज पंढरपूर येथून १५.४० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी १८.५० वाजता पोहोचेल.
- थांबे : बाळे, पाकणी, मुंढेवाडी, मोहोळ, मलिकपेठ, अंगार, वाकाव, माढा, वाडसिंगे, कुर्डुवाडी, मोडलिंब.
- संरचना : 10 डेमू कोच.
आरक्षण विशेष गाड्या क्र. 01419/01420 आणि 01421/01422 साठीचे बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.