भारतातील पहिली Hydrogen Train २०३१ मध्ये धावणार

पहिली Hydrogen Train हरियाणा राज्यात ८९ किमी लांबीच्या जिंद-सोनीपत विभागात धावण्याची शक्यता

63

डिझेलशिवाय विद्युतीकरणाकडे वळलेली भारतीय रेल्वे (Indian Railways) आता आणखी एक नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वे चालू करण्याची तयारी करत आहे. ही हायड्रोजन रेल्वेगाडी (Hydrogen Train) मार्च २०३१ मध्ये भारतामध्ये धावण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Vantara : गुजरातमधील ‘वनतारा’ वन्यजीव बचाव केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन)

भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यात ८९ किमी लांबीच्या जिंद-सोनीपत विभागात धावण्याची शक्यता आहे. जानेवारीत ‘आयसीई’चे महाव्यवस्थापक यू. सुब्बाराव म्हणाले होते की, भारताने अलीकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे रेल्वेगाडीचे इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते ६०० हॉर्सपॉवर क्षमतेची हायड्रोजन रेल्वे तयार केली आहे, तर भारताने १ सहस्र २०० हॉर्सपॉवर क्षमतेचे इंजिन बनवून यश मिळवले आहे.

ही हायड्रोजन रेल्वे चेन्नई (Chennai) येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (Integral Coach Factory, आयसीई) येथे बनवली जात आहे. हायड्रोजनवर धावणार्‍या रेल्वेमुळे शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यास मोठे साहाय्य होणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रेल्वे मंत्रालयाने ३५ ‘हायड्रोजन फ्युअल सेल’ (Hydrogen fuel cell) आधारित रेल्वे विकसित करण्यासाठी २ सहस्र ८०० कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदिल दिला होता. (Hydrogen Train)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.