ऐन सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीची (IRCTC ) वेबसाईट आणि ॲप डाऊन झालं आहे. तात्काळ तिकीट करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मेन्टेनन्स ॲक्टिव्हिटीच्या (Maintenance activity) मॅसेज सोबत ॲप आणि वेबसाईट बंद असल्याचं आयआरसीटीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे. (IRCTC )
हेही वाचा-Nainital Bus Accident : नैनितालमध्ये बस 100 मीटर खोल दरीत कोसळली; 4 ठार, 21 जखमी
आयआरसीटीसीनं (IRCTC ) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मेंटेनन्सच्या कामामुळं ई-तिकीट सेवा सध्या उपलब्ध नसेल, असं आयआरसीटीसीनं वेबसाईटवर जाहीर केलं आहे. थोड्या वेळानंतर तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आयआरसीटीसीनं केलं आहे. आज (२६ डिसेंबर) सकाळी 10 वाजण्यापूर्वी या संदर्भातील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेकांना वेबसाईटवर लॉगिन करता येत नव्हतं. (IRCTC )
हेही वाचा-Nainital Bus Accident : नैनितालमध्ये बस 100 मीटर खोल दरीत कोसळली; 4 ठार, 21 जखमी
डाऊन डिटेक्टर्सनं देखील आयआरसीटीसीच्या (IRCTC ) वेबसाईटला सकाळी अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं असल्याचं म्हटलं. 9 डिसेंबरला देखील आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप डाऊन झाली होती. संतापलेल्या प्रवाशांनी माध्यमांसमोर त्यांची नाराजी आणि संताप व्यक्त केला. काही यूजर्सनी तात्काळ तिकीटांच्या बुकिंग संदर्भात अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. (IRCTC )
रेल्वे प्रवासाचं तिकीट बुक करण्यासाठी तात्काळ बुकिंगचा पर्याय वापरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर आयआरसीटीसीनं देखील याची दखल घेत वेबसाईटवर मेन्टेनन्स सुरु असल्याचं सांगितलं. (IRCTC )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community