IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, नागरिक संतापले

33
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, नागरिक संतापले
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, नागरिक संतापले

भारतीय रेल्वेतून (Indian Railway) आरक्षित तिकिटावरुन प्रवास करायचा असल्यास आयआरसीटीसीद्वारे (IRCTC Down) तिकीट बुकिंग करावं लागतं. गेल्या काही दिवसांपासून या वेबसाईटला तात्काळ तिकीट बुकिंग करताना अनेकदा समस्या निर्माण झालेल्या आहेत. तात्काळ तिकीट बुकिंग च्यावेळी वेबसाईट आणि अॅपवर ((IRCTC App) अनेक जण लॉगीन करत असल्यानं अडचणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. (IRCTC Down)

हेही वाचा-Indian Army Himkavach : भारतीय सैन्याला मिळाले ‘हिमकवच’ ; आता -60°C तापमानातही सैनिकांना जाणवणार नाही थंडी

आयआरसीटीसीची (IRCTC Down) वेबसाईट वारंवार डाऊन होत आहे. काल (११ जाने.) देखील आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अॅप डाऊन झालं होतं. आज (१२ जाने.) देखील काही यूजर्सना आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर अडचणींचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं. काही जणांनी डाऊन डिटेक्टरवरील रिपोर्ट सादर करत तक्रारी केल्या.

हेही वाचा-नव्या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार; Pratap Sarnaik यांची माहिती

गेल्या महिन्यात आयआरसीटीसीची वेबसाईट (IRCTC Down) आणि अॅप 26 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला डाऊन होती. काल (११ जाने.) देखील आयआरसीटीसीची वेबसाईट डाऊन झालेली दिसून आली. डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार आज 11 च्या दरम्यान देखील आयआरसीटीसीच्या वेबसाईटला तांत्रिक अडचणी आल्या होत्या.

हेही वाचा-Mumbai Metro: मेट्रोचा वेग वाढला! मुंबईकरांचा वेळ वाचणार, मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार

आयआरसीटीसीनं त्यांच्या वेबसाईटवर मेंटनन्ससाठी वेबसाईटवरी ई-तिकिटिंग सुविधा उपलब्ध नाही. थोड्या वेळानं प्रयत्न करा असा मेसेज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी पाचव्यांदा आलेल्या आहेत. (IRCTC Down)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.