भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) अनेक अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात दर्शनासाठी येत असतात. त्यावेळी मुंबईसह सर्वच रेल्वे स्थानकात आंबेडकर अनुयायांची गर्दी असते. त्यामुळे आंबेडकर अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ( Mahaparinirvan Din )
(हेही वाचा : Delhi Assembly Election : आता लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूक)
मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोईसाठी दि. ५ डिसेंबर आणि दि. ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.(Dr. Babasaheb Ambedkar)
तपशील खालीलप्रमाणे-
मेन लाइन- अप विशेष:- कल्याण- परळ विभाग:
कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.
मेन लाइन – डाऊन विशेष:- परळ- कल्याण विभाग:
परळ-ठाणे विशेष परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ येथून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – अप विशेष:- पनवेल – कुर्ला विभाग:
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन – डाऊन विशेष – कुर्ला – पनवेल विभाग:
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community