Maharaja Express: भारतातील सर्वात महागड्या ट्रेनची किंमत तुम्हाला माहिती आहे का?

89
Maharaja Express: भारतातील सर्वात महागड्या ट्रेनची किंमत तुम्हाला माहिती आहे का?
Maharaja Express: भारतातील सर्वात महागड्या ट्रेनची किंमत तुम्हाला माहिती आहे का?

महाराजा एक्सप्रेस (Maharaja Express) ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन आहे. महाराजा एक्स्प्रेस (Maharaja Express Train) ट्रेनला इंडियन रेलवे टूरिज्म कॉरपोरेशनद्वारे चालवण्यात येते. ही ट्रेन देशातील वेगवेगळ्या चार मार्गावर चालते. या चारमधील कोणत्याही एका मार्गाची तुम्ही निवड करु शकता. सात दिवसांचा प्रवास असेल, यादरम्यान तुम्ही लग्जरी ट्रेन आणि सोई सुविधांचा अस्वाद घेऊ शकता.

महाराजा ट्रेनच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या ट्रेनच्या प्रत्येक बोगीला मोठ मोठ्या खिडक्या आहेत. त्याशिवाय कॉम्प्लिमेंट्री मीनी बार, एअर कंडिशिनिंग, वायफाय, लाइव टीवी, डीवीडी प्लेअर यासह अनेक लग्जरी सोई सुविधा देण्यात आल्या आहेत. महाराजा एक्स्प्रेसचं तिकीट पाच लाख रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंतचं आहे. महाराजा एक्स्प्रेस देशभरात पाच कॅटेगरीमध्ये प्रवास करते. यात हेरिटेज ऑफ इंडिया, ट्रेजरर्स ऑफ इंडिया, जेम्स ऑफ इंडिया, द इंडियन पॅनोरमा आणि इंडियन स्प्लेंडर टूर यांचा समावेश आहे. (Maharaja Express)

महाराजा एक्स्प्रेसमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या बोगी आहेत. त्यामध्ये डिलक्स केबिन, सुइट, जूनियर सुइट आणि प्रेसिडेंशिअल सुइट यांचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी दोन प्रकारचे पॅकेज देण्यात आले आहेत. तीन रात्र आणि चार दिवस आणि दुसरा पॅकेज सहा रात्र आणि सात दिवस.. या दोन पॅकेजद्वारे या ट्रेनमधून प्रवास करता येईल. या एक्स्प्रेसच्या केबीनला रत्नांच्या नावावरून नावे देण्यात आलेली आहेत. त्यात मोती, हीरा, नीलम, फीरोजा, मुंगा आणि पुखराज यांचा समावेश आहे. (Maharaja Express)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.