Kamakhya Express Accident : ओडिसामध्ये मोठा रेल्वे अपघात, कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले

Kamakhya Express Accident : ओडिसामध्ये मोठा रेल्वे अपघात, कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले

78

ओडिसामध्ये रविवारी (३० मार्च) एक मोठा रेल्वे अपघात (Kamakhya Express Accident) झाला आहे. ओडिसाच्या चौद्वारजवळ कामाख्या एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याचे वृत्त आहे. चौद्वार परिसरातील मंगुली येथील पॅसेंजर थांब्याजवळ ही ट्रेन रुळावरून घसरल्याचे वृत्त आहे. (Kamakhya Express Accident)

प्राथमिक माहितीनुसार, संपूर्ण एसी ट्रेन असलेल्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिला नाही. (Kamakhya Express Accident)

हेही वाचा-Gudhi Padwa 2025 : स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूर येथे उभारली हिंदुत्वाची गुढी

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन ओडिशाच्या चौद्वारजवळ रुळावरून घसरली. ट्रेनचे किमान ११ डबे रुळावरून घसरले आहेत. आज सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासनासह स्थानिक पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Kamakhya Express Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.