
दिल्लीमध्ये होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi Sahitya Sammelan) खास धावणाऱ्या पुणे-दिल्ली रेल्वेच्या प्रवासादरम्यान ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरणार आहे.
साहित्यरसिकांना पुण्यातून घेऊन जाणाऱ्या या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत.
(हेही वाचा – Pune Metro : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात बदल ; काय आहे कारण ?)
राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत (Uday Samant) या ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’चे (Marathi Sahitya Sammelan) स्वागताध्यक्ष असून, तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ (Marathi Sahitya Sammelan) सहभागी होऊन, रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. रेल्वेमध्ये होणारे हे पहिलेच मराठी संमेलन ठरणार आहे, अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. लेखक शरद तांदळे, वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community