Mega Block : पश्चिम रेल्वेवर रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील ‘या’ लोकल सेवा रद्द

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या कामासाठी अप आणि डाऊन या दोन्ही लोकल मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे.

300
Mega Block : पश्चिम रेल्वेवर रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील 'या' लोकल सेवा रद्द

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा कामासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर आणि अप -डाऊन हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द झाल्या आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या कामासाठी अप आणि डाऊन या दोन्ही लोकल मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार (३ जून) रात्री १२ ते रविवारी (४ जून) दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे.

(हेही वाचा – ओडिशाच्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

या ब्लॉकमुळे (Mega Block) अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही. याशिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील आणि परतीच्या दिशेने ही ट्रेन अंधेरीहून धावणार आहे.

या लोकल रविवारी रद्द होणार

ब्लॉककालावधीत (Mega Block) हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव दुपारी १. ५२ वाजता, गोरेगाव- सीएएसएमटी १२. ५३ वाजताची लोकल रद्द झाली आहे. ब्लॉकपूर्वी डाउन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री १०.५४ वाजता सुटेल आणि रात्री ११. ४९ वाजता गोरेगावला पोहोचेल. तर अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री ११.०६ वाजता सुटेल आणि रात्री १२.०१ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

हेही पहा – 

ब्लॉक (Mega Block) कालावधीत वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा बंद राहतील. याशिवाय दुपारी १२.१६ आणि २. ५० वाजताची चर्चगेट- बोरिवली लोकल विरारपर्यत धावणार आहे. बोरिवलीहून दुपारी १. १४ आणि ३. ४० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द झाली आहे. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १. ४५ आणि दुपारी ४. १५ वाजता सोडण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.